पहिल्याच पावसात सांगळूदकर नगरमधील रस्ते झाले जलमय (राजकीय डावपेचात अडकले रस्ते)

160

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
पावसाळा सुरू होण्याअगोदरच
सांगळूदकर नगर मधील रस्ते झाले जलमय नगरपरिषद हद्दीमधील सर्वाधिक कर देणारेबहे नगर असतानासुद्धा भौतिक सेवा सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसत आहे एका पावसाच्या ठोकामध्येच संपूर्ण नाल्याचे पाणी रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे व रस्त्यावरील पाणी डोक्याच्या स्वरूपात साचले आहे साचलेल्या पाण्यामध्ये डासाची निर्मिती होऊन रोगराई पसरण्यासाठी हे डबके कारणीभूत ठरत आहेत या पाण्यामुळे रोगाचा फैलाव व कोरोना चा प्रसार होण्यासाठी हे डबके अनुकूल ठरत आहे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याची नाल्याची दुर्दशा निकाली निघत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे परंतु हे नगर प्रतिष्ठित नागरिकांच नगर म्हणून ओळखल्या जाणारे असून सुद्धा सेवा सुविधा पाहिजे तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही या नगरामध्ये सर्व दिग्गज नगरसेवक होऊन गेले मात्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब होत आहे सर्वाधिक गलथान कारभार या नगरा चा म्हणण्यास वावगे ठरेल पहिल्याच पावसामध्येच रस्त्याची दुर्दशा एवढी भयानक झाली आहे की संपूर्ण रस्ते पाण्यामुळे ब्लॉक झाले आहेत त्या डबक्यामधूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे व लहान मुले वयोवृद्ध यांना येणेजाणे कठीण होत आहे त्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पावसाळा लक्षात घेऊन रस्त्याचे मजबूत बांधकाम करणे महत्त्वाचे आहे असे नागरिकांच्या वतीने प्रशासनाला सांगण्यात येत आहे सेवा सुविधेचा कर या नगरा मधून मोठ्या प्रमाणात गोळा होत असताना सुद्धा भौतिक सोयी सुविधा देण्यासाठी नगरपरिषद प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे या सर्व परिस्थितीचा नगरपरिषद प्रशासन आरोग्य विभाग व इतर विभाग यांनी एकत्रित येऊन नगराच्या हिताचा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे मात्र याउलट परिस्थिती असल्यामुळे हे रस्ते राजकीय डावपेच्यातअडकले असल्याचे समजते.