बल्लारपुर न.प.कंत्राटी सफाई कामगारांचे लसिकर करा व सुरक्षा विमा द्यावा:अमर धोंगड़े भीम आर्मी तर्फे बल्लारपुर नगरपरिषद मुख्याधिकारीना दिले निवेदन मागण्या पूर्ण न झाल्यास कामगारांना घेवून बेमुदत कामबंद आंदोलनाचा ईशारा

84

 

दख़ल न्यूज़ भारत@शंकर महाकाली

बल्लारपुर : मागील दिड वर्षांपासून कोविड 19 कोरोना चा प्रादुर्भावामुळे संपुर्ण देशात संचारबंदी केलेली असतांना या महामारीला घाबरून आपण सर्व घरी बसलेलो आहोत,मात्र आपल्या सर्वांची काळजी घेत आपल्या जीवाची पर्वा न करता सफाई कामगार दिवसरात्र सेवा देत आहेत,आपण सुरक्षित घरी बसलेले असताना कोरोना चे लसीकरण करण्यासाठी धावपड करून व आपला रुबाब दाखवून लसीकरण करून घेत आहोत,मात्र आमच्या सुरक्षतेसाठी धडपडणारे आम्हचे योध्ये मात्र अजूनही लसीकरणापासून दूर आहेत किंबहूना त्यांना दूर ठेवल्या जात आहे. तेव्हा बल्लारपूर शहरात चालू असलेल्या कोविड सेंटर मध्ये पाहिले स्वच्छता सफाई कामगार यांना कोविड चे लसीकरण करून द्यावे व नंतरच सामान्य नागरिकांना लसीकरण करावे.
तसेच या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या या योध्याना सुरक्षा विमा द्यावा व सन्मान करावा.अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशन बल्लारपुर सफाई कामगारांना घेवून बेमुदत कामबंद तीव्र आंदोलन करेल.
निवेदन देताना भीम आर्मी चे शहर अध्यक्ष अमर धोंगड़े , उपाध्यक्ष बबलु करमनकर , अमन सोमकुंवर , सुयोग खोब्रागडे , बादल ताकसांडे , साहिल गायकवाड़ ,मंथन पाटिल , अक्षय नीरांजने , अनिकेत ताकसांडे , मयूर आमटे, गोलु रायपुरे , लड्डू सांडे , सुदेश शिंगाड़े , चेतन तेलतुंबड़े , अजित पडवेकर , रोहित मेश्राम उपस्तित होते.