कोळशाने भरलेला ट्रक पलटला नदीपात्रात पुलाच्या जर्जर अवस्थे संदर्भात वेकोलि प्रशासन गाढ झोपेत

235

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

मुंगोली कडून घुग्घुस कडे जात असलेल्या सप्रा ट्रान्सपोर्टचा ट्रक क्रमांक एम एच 34 ए बी 12 44 हा वर्धा नदीच्या पात्रात पडल्याचे कळते. सदर ट्रक मुंगोली खदाणीतून कोळसा भरून घुग्घुस येथील रेल्वे सायडिंग कडे जात होता. वर्धा नदीच्या पुलावरून जात असताना अचानक समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका ट्रकने या 18 चाकाच्या या ट्रकला कट मारला असता कोळशाने भरलेल्या या ट्रकचे संतुलन बिघडले व तो नियंत्रणाबाहेर गेल्याने तोल जाऊन नदीपात्राच्या डाव्या बाजूच्या 20 मीटर खोल पात्रात कोसळला.
सदर घटना दिनांक 7 मे च्या पहाटेला घडली असून अपघातात ट्रक चालक सुनील साखरे वय वर्षे 35 राहणार गडचांदूर हा सुदैवाने बचावला असून किरकोळ जखमी आहे. घटनेची माहिती सप्रा ट्रान्सपोर्ट च्या कार्यालयात प्राप्त होताच कंपनीच्या कामगारांनी त्वरित हालचाल करून चालकास नदीच्या पात्रातून बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचल्याचे कळते. मुंगोली येथील वर्धा नदीवरील हा पूल अत्यंत जुना झाला असून अतिशय जर्जर अवस्थेत आहे अनेक वेळा याची चर्चा तथा तक्रारी वेकोली प्रशासनास करून सुद्धा वेकोली प्रशासन मात्र गाढ झोपेत असलेल्या असल्याचे दिसून येत आहे.