नंदारा ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण सोहळा सपन्न

0
126

 

प्रतिनिधी/शुभम पारखी

चिमुर तालुक्यातील ग्रामपंचायत नंदारा येथिल ग्रामपंचायत भवनाची वास्तू जीर्ण अवस्थेत असल्याने गावाशेजारी ग्रामपंचायतीचे स्वतःचे जागेवर नवीन भवन उभारण्यात आले असून काल गुरूवारला जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांचे हस्ते, पंचायत समिती चिमूरच्या सभापती लता पिसे यांचे अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा संपन्न झाला, यावेळी प.स. चिमूरचे उपसभापती रोशन ढोक, प स माजी उपसभापती तथा गटनेता शांताराम सेलवटकर, ग्रा. प. नंदारा च्या सरपंच सुनीता गायकवाड,
सदस्य संगीता गायकवाड,नंदारा तमुस अध्यक्ष विनायक गजभिये आणि गावकरी उपस्थित होते, यावेळेस वृक्षारोपण करण्यात आले.