ग्रामीण रूग्णालयात अठरा वर्षावरील व्यक्तींच्या लसिकरणाला सुरवात.

60

माहूर प्रतिनिधी // पवन कोंडे

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून शासनाने 18 वर्षावरील प्रत्येकालाच कोविड प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार शुक्रवार दि.7 मे रोजी माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात शुक्रवार दि.7 मे पासून 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना कोविड प्रतिबंधक (कोव्हॅक्सिन 150 ) लस देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आला.पहीली लस पद्मा जयंत गि-हे यांना देण्यात आली.
शासन निर्णया नुसार प्रथम कोरोना योद्धयांना लस देण्यात आली. त्यानंतर वयोवृद्ध व्यक्तीं, गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लस देण्यात आली. कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने व त्याचा संसर्ग तरूण वर्गावरही होत असल्याने 18 ते 44 या वयोगटातील सर्वांनाच लस दिली जाणार आहे.त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सय्यद वसीम व डॉ.रोहित अंबेकर यांचे मार्गदर्शनात डी.डी.मुळे,एस.वाय.कावळे,एम.ए.शिवशेट्टे,पी.आर.कचकलवार व खरे सिस्टर लस देण्यासाठीची जबाबदारी पार पाडीत आहेत.
लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पो.नि.नामदेव रिठ्ठे यांचे मार्गदर्शनात दत्ता पेंदोर,सुशील राठोड,रामचंद्र दराडे व किशोर जाधव हे पोलीस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.