आमदार डॉ परिणय फुकें नी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी. शासन स्तराहून मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध.

44

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद येवले

लाखांदूर- गत पाच दिवसापुर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीटीमुळे लाखांदुर तालुक्यातील बहुतांश गावांमधील जवळपास हजारो हेक्टर क्षेञातील धानपिक व बागायती शेतीचे नुकसान झाले असता, आमदार डाँ. परिणय फुके यांनी गुरूवारला (ता.06) क्षतीग्रस्त भागाचा दौरा करून धानपिकाची पाहणी केली असून, नुकसानीचा मोबदला मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.
शनिवारला दि. 1 मे रोजी सायंकाळी सुमारास लाखांदुर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती. यात पिंपळगाव/कोहळी कन्हाळगाव, चिचगाव, मडेघाट, पुयार व लाखांदूर या भागात पावसासह गारपीटी देखील पडल्याने धानपिकासह, बागायती शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे क्षतीग्रस्त भागात 1315 हेक्तर क्षेञात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यात 425 हेक्तर क्षेत्रात 33 टक्के पेक्षां अधिक नुकसान झाली आहे. तर 860 हेक्तर क्षेत्रात 33 टक्के पेक्षा कमी नुकसान झाली आहे. दरम्यान आमदार डॉ परिणय फुके यांनी माहिती प्राप्त झाली असता, अन्य कामे बाजूला सारत त्यांनी लाखांदुर तालुक्यातील क्षतीग्रस्त भागात दौरा करत धान पिकाची पाहणी केली आहे.
यावेळी तहसिलदार अखिलभारत मेश्राम, कृषी विस्तार अधिकारी बालाजी शेन्नेवाड, भाजपा तालुका अध्यक्ष विनोद ठाकरे, ॲड वसंत एंचीलवार , नरेश खरकाटे, गोपी भेंडारकर, प्रकाश राऊत, भारत मेहंदळे, कृषी सहाय्यक अतुल देशमुख, नितीन बोरकर, रिजवान पठाण, भाऊराव दिवठे, भाष्कर झोडे, शैलेश मोटघरे, तुळशिदास बुरडे, प्रियंक बोरकर, जितेंद्र ढोरे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
क्षतीग्रस्त भागाचा दौरा आटपून आ.फुके यांनी लाखांदुर तहसील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही. सर्वांना नुकसानीचा मोबदला मिळेल या पद्धतीने सर्वे करण्याचे निर्देश दिले असून, क्षतीग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे..