विजेचा लपंडावाचे तात्काळ समस्या निकाली काढा – आ.कृष्णा गजबे

0
211

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

देसाईगंज: पावसाळ्याची चाहूल लागून सुद्धा निसर्गाने शेतकरी मित्रांना तसेच सर्वसामान्य जनतेला साफ निराश केलं.भयावह गर्मी ऊन अश्या अनेक गोष्टींचा सामना जनतेला करावं लागत आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात विज वितरित होणा-या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. तर कमी वीज दाबामुळे गावे अंधारमय झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गावागावातील पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण होत आहेत. तसंच विजेच्या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक उपकरने निकामी होण्याची भीती वाढली आहेत.
सध्या उष्णता कायम असल्याने लहान मुलासह आबालवृद्धांना उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होत असताना दिसत आहे. वीजेच्या खेळखंडोबामुळे लोकांना फॅन आणि कुलरचा वापरही नीट करता येत नाही. त्यामुळे परिसरातील जनता गर्मीने होरपळून निघत आहे. दर पाच-पाच मिनिटात वीज खंडित होत असल्याने नागरिकांत वीज वितरण बाबत संताप व्यक्त केल्या जात आहे.
ही बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे याना लक्षात येथेच तात्काळ दिनांक ३० जुलै रोजी आपल्या जनसंपर्क कार्यालयात विज वितरण अधिकाऱ्यांसी बैठक बोलवून जनतेला कसल्याही प्रकारचा नाहक त्रास न देता .तात्काळ विज विषय समस्या चे निवारण करण्याचे सूचना दिल्या. यावेळी मा.मोतीलाल जी कुकरेजा उपाध्यक्ष न. प. देसाईगंज,देशपांडे साहेब मुख्य अभियंता म.रा.वि.वि.क.चंद्रपूर,विजय जी मेश्राम साहेब कार्यकारी अभियंता,अनिल जी बोरसे साहेब अधिक्षक अभियंता, नितीन जी बन्सोड माजी उप सरपंच ग्रा. प. विसोरा उपस्थित होते.