स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती तर्फे रक्तदान शिबिर

63

 

अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दाखल न्यूज भारत

आरमोरी :- सगळीकडे कोरोणाचा हाहाकार माजलेला असतांनाच कोरोणाच्या या संकट काळात जिल्हा रक्तपेटी ला खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने, रक्ताची नितांत गरज बघता
दिनांक ६ मे २०२१ ला वेळ सकाळी १०:०० वाजता पासून ते १:०० वाजता पर्यंत स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती तर्फे आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. बऱ्याच युवकांनी आपल्या covid-19 व्हॅक्सिनेशन घेण्याच्या आधीच रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले.
ज्यामध्ये रक्तदाते अंकुश गेडाम, चेतन दडमल ,तुषार खापरे ,प्रशांत खापरे,दीपक सोनकुसरे, शुभम धकाते, प्रतीक रामटेके, अक्षय पिपरे, मोहित राऊत ,विपुल मिसार सर्व रक्तदात्यांचे
“स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती” अध्यक्ष माननीय- चारुदत्त राऊत यांनी आभार मानले या रक्तदान शिबिर शिबिराच्या आयोजना करिता प्रफुल खापरे ,मनोज गेडाम ,फिरोज पठाण, रोशन दुमाने ,स्वप्निल सोरते, प्रशांत दोनाडकर, सारंग जांभुळे ,स्वप्निल बेहरे ,प्रल्हाद धोटे सहकार्य केले.
याप्रसंगी रक्त दात्याना अल्पोपहार वितरित करण्यात आले. व जिल्हा रक्तपेटी च्या सर्व कर्मचाऱ्यांनी नवीन रक्तदात्यांना रक्तदानाचे फायदे व योग्य मार्गदर्शन केले.