परिसरातील उद्योगांनी सी एस आर फंड द्वारे व्हेंटिलेटर/ ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्याची शिवसेना घुग्घूस ची मागणी

153

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

दिनांक 6 मे रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घूस शिवसेनेच्या वतीने प्रभारी शहर प्रमुख सतीश बोंडे यांचा नेतृत्त्वात घुग्घुस परिसरातील उद्योगांना व कंपनीला सी एस आर फंड द्वारा व्हेंटिलेटर/ ऑक्सीजन बेड घुग्घूसवासियांना उपलब्ध करून देण्याची मागणी एका निवेदना द्वारे केली आहे. जेणेकरून सध्या कोरोना मुळे परिसरातील नागरिकांना होत असलेल्या असुविधेत उद्योगांचा सुद्धा हातभार लागावा व त्यांनी सुद्धा आपली सामाजिक जबाबदारी निभवावी.
निवेदन देताना शिवसेना प्रभारी शहर प्रमुख सतीश बोंडे , माजी शिवसेना शहर प्रमुख बंटी घोरपडे, युवा सेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, युवासेना घुग्घूस चेतन बोबडे , अवि डोहे आदी उपस्थित होते.