राजीव रतन केंद्रीय इस्पितळात होत असलेले कोरोनाचे लसीकरण की प्रसारण लसीकरण मोहिमेदरम्यान उडाला सोशल डिस्टंसिंग चा फज्जा

163

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

घुग्घुस परिसरातील लसीकरण केंद्रांवर बऱ्याच प्रतिक्षेनंतर कोविद लस उपलब्ध झाल्याने आता लसीकरण पुन्हा दिनांक 6 मे रोजी पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे आता परिसरात कोरोना लसीकरणाला वेग येण्याची शक्यता आहे मात्र या सर्व प्रक्रियेमध्ये राजीव रतन केंद्रीय इस्पितळात होत असलेल्या लसीकरण केंद्राच्या परिसरात मात्र गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंग चा पुरता फज्जा उडालेला दिनांक 6 मे रोजी दिसून येत होता.
राजीव रतन केंद्रीय इस्पितळांमध्ये 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे .दिनांक 6 मे रोजी या केंद्रा करिता 150 लसीचे डोज वितरित करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी टोकन घेण्याच्या रांगेमध्ये जवळजवळ सातशे लोकांची गर्दी आढळून आली. कोरोना प्रतीबंधक उपाय व सोशल डिस्टंसिंग चा कुठेही मागमूस दिसून आला नाही. आरोग्य विभागा द्वारे ही लसीकरण मोहीम चालवल्या जात आहे मात्र या ठिकाणी आलेल्या निर्बुद्ध नागरिकांना सोशल डिस्टंसिंग साठी बाध्य करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असून वेकोलि प्रशासन सुद्धा आपले हात यापासून झटकू शकत नाही. एवढे असूनही त्या ठिकाणी उपस्थित असलेले वेकोलीचे सुरक्षा कर्मचारी मात्र या सगळ्या प्रकाराकडे ढिम्मपने दुरून पाहत असल्याचे दिसून आले.
या सर्व तापदायक प्रकारामुळे परिसरातील कोरोना चा उद्रेक पुन्हा होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजीव रतन केंद्रीय इस्पितळात होत असलेले कोरोना चे लसीकरण आहे की प्रसारण हेच कळायला मार्ग नाही. तसेच गर्दी टाळण्यासाठी टोकन देत असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी चे टोकन सुद्धा याठिकाणी देण्यात यावे जेणेकरून त्या दिवसाचे निर्धारित डोज संपल्यावर त्या ठिकाणी पुन्हा रोज येऊन नागरिकांच्या वेळेचा अपव्यय व मानसिक त्रास वाचावा. हा सर्व अक्षम्य प्रकार पाहता प्रशासन आणि राजीव रतन केंद्रीय इस्पितळाच्या प्रशासनाने सुद्धा गाढ झोपेतून जागे होऊन आपली जबाबदारी निभवावी अशी आशा परिसरातील जनता करीत आहे अन्यथा कोरोनाची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.