खासदार कृपाल तुमाने यांनी कुही तालुक्यातील कोविड चा परिस्थिती व वैद्यकीय सुविधांचा घेतला आढावा

38

 

प्रतिनिधी //नंददत्त डेकाटे

आज कुही तहसील कार्यालयात कुही तालुक्यातील कोविड परिस्थिती व वैद्यकीय सुविधांचा आढावा खासदार कृपाल तुमाने यांनी घेतला. कोविड वर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तालुक्यात अम्ब्युलंस सेवा सुरळीत मिळाव्यात व अम्ब्युलंस अभावी कुणाचिही वाताहत होणार नाही याची काळजी घेण्याचे तहसीलदार यांच्यासह संबधित प्रशासनाला निर्देश दिले. या सोबतच संसर्ग वाढू नये यासाठी ब्रेक द चेन निर्बंधांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. कुही कोविड केअर सेंटरमध्ये रुणांना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे निर्देश दिले. सोबतच कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे आवाहन केले.