शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आज रक्तदान शिबीर संपन्न. पूजाताई रावेतकर.

84

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
राज्यात कोरोनामुळे प्लाझ्मा व रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी शिवसैनिकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघांच्या वतीने आज रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. या शिबिरासाठी महिला संघटीका पुजाताई रावेतकर व उपतालुका संघटीका कावेरी येनपूरे , विभाग संघटीका मनीषा वांजळे प्रभाग संघटीका सपना घावरे यांच्या पुढाकाराने तसेच विभाग संघटक महादेव येनपूरे तसेच मयूर वांजळे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर पार पडले. या शिबीराला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, उपजिल्हा प्रमुख महेश मते, विधानसभा प्रमुख नितीन वाघ, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, जिल्हा परिषद सदस्या अनिताताई इंगळे, दीपक शेडे,सचिन पासलकर, भावना ताई थोरात, संतोष शेलार, सौरभ मोकाशी, तेजश्री डिंबळे,रामदास गायकवाड, मयूर वांजळे, गोरक घावरे, बळीराम वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जातात व यातून शिवसैनिकांच्या वतीने माणुसकीचे दर्शन घडते.