वाढदिवस लोकसेविकेचा, रक्तदान शिबीर राबवून व मास्क वाटप करून समाजहित जोपासून साजरा.

42

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
वारजे:काल वाढदिवसाच्या निमित्ताने अर्चना पराग ढेणे यांनी आपल्या प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा आहे याचा विचार करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदान शिबिराला प्रभागातील नागरिकांनी खूपच चांगला असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल अर्चना पराग ढेणे यांनी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानले. असेच आपले सहकार्य भविष्यात देखील लाभत राहील हा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया अर्चना पराग ढेणे यांनी व्यक्त केली.