आमदार विनोद अग्रवाल यांच्या यशस्वी पाठपुराव्याने अखेर शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले पाणी तेढवा-शिवनी, रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना आणि बाघ इटियाडोह प्रकल्प कार्यान्वित

136

 

प्रतिनिधी
राहुल उके
दखल न्यूज

गोंदिया : जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. गोंदिया जिल्ह्यातून जगभरात तांदूळ पाठविण्यात येतो. मात्र यंदा गोंदिया जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. गोंदिया जिल्ह्यात १ जून ते २७ जुलै दरम्यान जवळपास ५५१. मिमी पाऊस पडतो मात्र यंदा २९८. इतकीच पावसाची नोंद झाली असून जवळपास ४५% कमी पाऊस क्षेत्रात झाला आहे. शेतकऱ्यांनी पहिलं पाऊस पडता शेतीच्या कामाला सुरूवात केली होती मात्र नंतर पाऊस न पडल्याने उभी पिके करपण्याची भीती शेतकरी बांधवांत होती. भात पिकाला सर्वाधिक पाण्याची आवश्यकता असते. सुरुवातीला गोंदिया तालुक्यात पाण्याची पुरवठा करण्यासाठी पुजारीटोला कालवा आणि इटियाडोह कालव्यातून पाणीपुरवठा व्हायचा. मात्र तालुक्यात शेवटपर्यंत पाण्याच्या सिंचन व्यवस्था पोहोचत नसल्याने तेढवा-शिवनी उपसा सिंचन तसेच रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. त्यात भूमिगत पाईपलाईनचे जाळे पसरवत तालुक्यातील विविध गावांमध्ये सिंचन व्यवस्था होईल यासाठी सोय करण्यात आली. मात्र या दोन्ही योजना पांढरा हत्ती बनवून नाममात्र उरल्या असून त्यांच्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळत नव्हता. नदीपात्रात असलेला गाढ, अनियमित विद्युत पुरवठा, प्रकल्‍पात असणाऱ्या तांत्रिक अडचणी मुळे संपूर्ण प्रकल्प निष्फळ ठरले होते. यासंबंधी शेतकऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे प्रकल्प सुरू करण्यासाठी तसेच भात पिकाला पाणी पुरवण्याची मागणी केली होती. त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी वैयक्तिक हस्तक्षेप करून विदर्भ पाटबंधारे विभाग गोंदियाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत दोन्ही प्रकल्पांना तात्काळ सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना दिली. त्यावर प्रकल्प अभियंता, शाखा अभियंता व इतर पदाधिकारी यांनी नदीपात्रात असलेला गाढ स्वच्छ करण्याचे कार्य सुरू केले व प्रकल्पातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू झाली. अखेर प्रकल्प सुरू झाला मात्र काही तासांतच पुनश्च विद्युत पुरवठा मध्ये अनियमितता असल्याने, तसेच कमी दाबाचे वोल्टेज असल्याने मोटार वारंवार बंद पडत होते. त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला. त्यावर आमदार विनोद अग्रवाल यांनी विद्युत विभागाला संपर्क करून व्होल्टेज दाब वाढवून प्रकल्पाच्या आवश्‍यकतेनुसार वीजपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आणि प्रकल्प पुन्हा सुरू झाले. नदीतील गाळ, तांत्रिक अडचणी, विद्युत पुरवठा असल्या विविध समस्यांना सामोरे जात अखेर दोन्ही प्रकल्पात सातत्य आले असून शेतकऱ्यांच्या बांधवांवर पाणी पोचले आहे.
पावसात अनियमितता आल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना धान पीक जळण्याच्या परिस्थितीत आल्याने चिंता वाढली होती. मात्र या दोन्ही प्रकल्पाच्या मदतीने भात पिकाला मुबलक पाणी उपलब्ध झाले असल्याने शेतकरी सुखावले असल्याचे दिसून येत असून शेतकरी बांधवांनी जनतेच्या आमदाराचे आभार मानले आहेत.