नागरिकांसाठी संस्थाच्या आवारातच लसीकरण केंद्र ऊपलब्ध करून द्यावे ही मागणी भाजपा सहकार आघाडीचे वतीने पुण्यनगरीचे महापौर मुरलीधरजी मोहोळ यांच्याकडे करण्यात आली. सचिन दांगट पुणे शहर अध्यक्ष सहकार आघाडी.

36

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे दि : दिनांक १ मे पासुन देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी सो यांनी जाहीर केल्याप्रमाणे १८ ते ४४ या वयोगटातील प्रत्येक भारतीयास कोरोना प्रतिबंधक लस देणार आहेत .
नुकत्याच आयुक्त आणि महापौर यांचे समवेत झालेल्या भाजपा शिष्टमंडळाचे बैठकीत जर एखाद्या कंपनीने आपणास लसीकरणासाठी लागणा-या मुलभूत सुविधा पुरविल्यास संबंधित जागेवर जाऊन आपण लसीकरण करून देत आहोत असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले होते .
याच धर्तीवर पुणे शहरातील नोंदीला असणारे गृहरचना सोसायट्यांच्या संख्या जवळपास १८००० इतकी असुन यापैकी किमान २०० प्लॅटचे पुढील सोसायटीने जर आपल्याला मुलभूत सुविधा आणि जागा ऊपलब्ध करून सर्व नियम अटींचे पालन केल्यास एका मोठ्या संख्येला लसीकरण केले जाऊ शकते .
मोठ्या गृहरचना संस्थामध्ये लसीकरणाची सोय करून दिल्याने नागरिक इतरत्र न फिरता कोरोना संसर्ग न वाढविता लसीकरण करून घेतील .
यासाठी आज पुणे शहरातील सर्व मोठ्या किमान २०० प्लॅट असलेल्या गृहरचना संस्थामध्ये रहाणारे नागरिकांसाठी संस्थाच्या आवारातच लसीकरण केंद्र ऊपलब्ध करून द्यावे ही मागणी भाजपा सहकार आघाडीचे वतीने पुण्यनगरीचे महापौर मुरलीधरजी मोहोळ यांच्याकडे करण्यात आली .
याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने , सभागृह नेते गणेशजी बिडकर , सचिन दांगट सहकार आघाडी अध्यक्ष पुणे शहर, सहकार आघाडी सरचिटणीस अजितजी देशपांडे , उपाध्यक्ष अक्षयसिंह शितोळे आदि पदाधिकारी उपस्थित होते .