देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाला २५ ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा – शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल यांचा पुढाकार

302

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व कोरोना रुग्णांची शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन रुग्ण दगावले जात असल्याची बाब दिनदुबळ्यांचे कैवारी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल यांच्या ध्यानात आल्याने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील उपजिल्हारुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजन सिलेंडर देण्याची धडक मोहीम हातात घेतलेली असुन त्याचाच एक भाग म्हणून आज ६ मे रोजी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयास २५ ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात येत असून यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होण्यास मदत होणार आहे.यापूर्वी चंदेल यांनी उपजिल्हारुग्णालय कुरखेडा व आरमोरी येथील रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा उपलब्ध करून दिला आहे.जनतेशी निगडित कुठलेही कार्य असो निस्वार्थपणे करून जनमानसात चंदेल यांनी ठसा उमटवला असल्याने त्यांच्या अभूतपूर्व कार्यास सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ग्रामीण रुग्णालय देसाईगंजला ऑक्सिजन पुरवठा प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत जोशी, माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,माजी तालुकाप्रमुख नंदू चावला,माजी शहर प्रमुख विकास प्रधान,अनिल उईके, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कोसे,सचिन शेळके व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.