लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिकांच्या रांगा लागू नयेत यासाठी लसीकरण केंद्रावर जेष्ठांसाठी टोकन पद्धत राबवा! गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

60

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

देवरुख : ग्रामीण भागात लसीकरणच्या नियोजना अभावी जेष्ठ नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे,लसीकरण केंद्रांवर रांगा लावूनही शेवटी लस नाही असे सांगितले जात आहे परिणामी होणारा लसीचा पुरवठा आणि दिल्या जाणाऱ्या लस याचे नियोजन करून जेष्ठ नागरिकांना टोकन दिल्यास गर्दी टाळता येईल अशी मागणी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.
ग्रामीण भागात ज्या 45 वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसऱ्या डोस ची मुदत होऊन गेली तरी अद्याप दुसरा डोस मिळत नसल्याचे दिसून येत आहे.यामुळे नेमका दुसरा डोस कधी मिळेल याबाबत स्पष्टता नसल्याने नागरिक सकाळीच लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत.देवरुख सारख्या तालुक्याच्या ठिकाणी लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अनेकांना रांगेत उभे राहील्या नंतर ही लस न घेता माघारी जावे लागत आहे.लसीचा दुसरा डोस पूर्ण व्हावा यासाठी जेष्ठ नागरिकांत गांभीर्य असताना लस देण्याबाबत नियोजन नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.ज्या जेष्ठ नागरिकांचा दुसरा डोस आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.ज्या ठिकाणी डोस साठी गर्दी होत आहे,जेथील मागणी अधिक आहे तिथे लसीकरण ची संख्या वाढवायला हवी,गर्दी टाळण्यासाठी आणि डोस कधी मिळणार याची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी जेष्ठांना लस कधी मिळणार याबाबत त्या त्या केंद्रांवर नियोजन करून टोकन द्यावे अशी मागणी सुहास खंडागळे यांनी केली आहे.

दखल न्यूज भारत