कोरोना रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व विचारसरणी बदलणे काळाची गरज

58

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
कोरोना रुग्णांची संख्या शहरी व ग्रामीण भागात झपाट्याने वाढत चाचली असून कोरोना रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व विचारसरणी बदलून कोरोना रुग्णांचे सामर्थ्य वाढविणे काळाची गरज आहे.
एखाद्या नागरिकाने कोरोनाची चाचणी केल्यानंतर कोरोना रुग्ण आढळून आल्यास जनसामान्यांच्या सर्व नजरा वेगवेगळ्या विचारसरणीच्या झालेल्या दिसून येत आहेत.शहरी व ग्रामीण भागातील नागरिक कोरोना रुग्णांकडे व रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांकडे तिरस्काराच्या भावनेने पाहणे,जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास मनाई करणे,दुजाभाव करणे,मन खच्चीकरण करणे,वाकड्या नजरेने पाहणे व इतर अशा अनेक खडतर प्रवाहात ढकलणे सुरू आहे.काही रुग्ण अशा वागण्यामुळे कोरोना विषयी मनात भीती बाळगून मरणाच्या दालनात उभे येऊन ठाकली आहेत.त्यामुळेच कित्येक नागरिक कोरोना चाचणी व कोरोना लस घेण्यासाठी स्वतःहून धजत नसल्याची बाब सामोरे येत आहे.सर्दी,खोकला,ताप, अंगदुखी,मळमळ वाटणे ही नित्याचीच सुरुवातीपासूनची लक्षणे आहेत.मात्र याकडे सर्व सामान्य नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन व विचार सरणी वेगळी स्वरूपाची झाली असल्याने मनात भीती बाळगून आणखी त्यामध्ये भर पडुन रुग्ण दगावली जात आहेत.कोरोना रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन व विचारसरणी बदलण्याकरिता खरंतर कोरोना विषयी जनजागृती करणे अतिआवश्यक आहे.जोपर्यंत कोरोना विषयी जनजागृती करण्यात येणार नाही तोपर्यंत कोरोना रुग्णांविषयी तिरस्काराच्या नजरेने पाहणे व आमच्या दुकानात येऊ नका असा पवित्रा घेणारे कोरोना नसलेल्या परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोरोना रुग्णांसाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिक दुजाभाव न करता सामर्थ्य वाढविण्यासाठी धीर देणे महत्वाचे आहे.कोरोना रुग्णांचे व कुटुंबातील कोरोना नसलेल्या सदस्यांचे मन खच्चीकरण न करता सांत्वन करून कोरोना संसर्गजन्य प्रादुर्भावाचा प्रकोप नाहीसा होण्यास पुढाकार घेतला पाहिजे.त्यासाठीच कोरोना रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व विचारसरणी बदलणे ही आजची काळाची गरज आहे.