Home चंद्रपूर  अवैद्य धंद्यावर पाथरी पोलिसांची धडक कारवाही

अवैद्य धंद्यावर पाथरी पोलिसांची धडक कारवाही

194

 

मंगेश सहारे
सावली प्रतिनिधी – दाखल न्यूज भारत
मो.नं : – 9921057753

सावली – दिनांक 16 मार्च 2020 रोजी पाथरी पोलीस स्टेशन येथे नुकतेच रुजू झालेले ठाणेदार श्री. योगेश घारे यांनी पोलीस स्टेशन पाथरी परिसरात प्रभावीपणे कर्मचारी यांचे मार्फत पेट्रोलिंग करून दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस स्टेशन पाथरी परिसरात गस्त घालून कर्मचारी यांना योग्य त्या सूचना देऊन दारूबंदी अंतर्गत कार्यवाही करून 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सट्टापट्टी, अवैध सुगंधित तंबाखू वाहतूक यांचेवर कार्यवाही करून बेकायदेशीर धंदेवाईकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
आगामी स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, पोळा या सणासुदीचे काळात पोलीस स्टेशन परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीकोनातून बिट अंमलदार यांना सतर्क करून अवैध दारू धंदेवाईकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहे. तसेच प्रभावीपणे पेट्रोलिंग करून परिसरात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली आहे.
ठाणेदार घारे हे पोलीस स्टेशन पाथरी येथे नुकतेच रुजू झाले असून अल्पावधीतच दारूबंदी कायद्यांतर्गत 62 गुन्ह्यांची नोंद करून अंदाजे 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सट्टापट्टी, जुगारवर छापा मारून अंदाजे 1,50,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे सुगंधित तंबाखू बाबत कार्यवाही करून ,27 हजार रुपयाचा मुद्देमाल वाहनसहित दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाबत संक्रमण संख्या वाढीत असून , पोलीस स्टेशन पाथरी परिसरात लागण होऊ नये , याकरिता ठाणेदार घारे हे स्वतः आरोग्याबाबत दक्ष असून परिसरात नागरिकांनी मास्क घालूनच बाहेर पडावे याकरिता मास्क कार्यवाही प्रभावीपणे करीत असून ग्रामभेट घेऊन नागरिकांना वैयक्तिक आरोग्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.कोरोनासारख्या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने संचारबंदी आदेश जारी केल्याने, पोलीस स्टेशन पाथरी यांनी विनाकारण विनापास प्रवास करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत गुन्हे दाखल केल्याने विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे संचारबंदी काळात स्थानांतरित कामगार यांना जेवणाची तसेच अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
दि. 28/07/2020 रोजी ठाणेदार घारे यांचे मार्गदर्शनात पोहवा. योगराज व पोशि. मनीष आणि मौजा अंतरगाव टोला जंगलपरिसरात दारूबंदी रेड करून 51 लिटर हातभट्टी मोहा दारू जप्त करण्यात आली असून , एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

एकंदरीत ठाणेदार योगेश घारे यांनी अल्पावधीतच पोलीस स्टेशन पाथरी परिसरातील अवैध धंदेवाईकांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्या मुसक्या आवळल्या असून अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच जनतेच्या आरोग्याची तळमळ लक्षात घेता, पोलीस स्टेशन पाथरी परिसरातील जनतेने ठाणेदार घारे यांचे आभार मानले आहे

Previous articleनगर पंचायत पंतप्रधान आवास योजना करिता समस्त त्रुटी दूर करण्याकरिता न,प,ने पुढाकार घ्यावा ! पंतप्रधान आवास योजना व म्हाडा अंतर्गत घरकुल बांधकामाच्या पूर्ती करिता बैठकीचे आयोजन
Next articleआमदार विनोद अग्रवाल यांच्या यशस्वी पाठपुराव्याने अखेर शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले पाणी तेढवा-शिवनी, रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना आणि बाघ इटियाडोह प्रकल्प कार्यान्वित