चिमूर येथील जिव घेण्या हिलिंगटच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर होणार कारवाई आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी दिले आश्वासन

132

 

चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खुलेआम कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून दारातच घेतले जातात २ लाख रुपये व चुकीच्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करून रुग्ण मारले जात आहे. या हॉस्पिटलला नॉर्मल रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली गेलेली असून सुद्धा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर या हॉस्पिटलमध्ये घेतले जातात आणि चुकीच्या पद्धतीने उपचार करून रुग्णांना मारले जात आहे. तसेच एकाच दिवशी २० ओ टू सिलेंडर तर दोन दिवसात एका रुग्णाला २५ सिलेंडर लावली जातात हा काय प्रकार आहे ? अशा प्रकारच्या ट्रेटमेंट ने रुग्ण वाचेल कि मरेल असा स्थानिकांचा मत आहे. याचबरोबर या रुग्णालयावर कारवाई करून रुग्णालयाला सिल ठोकून बंद करून हॉस्पिटल मध्ये मृत रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारार्थ घेतलेली लाखो रुपये फी परत करण्यात यावे व फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांना मृत रुग्णांचे भावंड शिवम सोरदे शांतिभूषण सोरदे तसेच भारतीय क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष डार्विन कोब्रा व उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर , कैलास भोयर यांनी केली असता लवकरात लवकर या हिलींगटच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर कारवाई होणार असे आमदारांनी आश्वासन दिले.यावेळी उप विभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ , तहसीलदार संजय नगतीळक , वैधकीय अधीक्षक डॉ.गो.वा. भगत , चिमुर.पो.स्टे.पोलीस निरीक्षक शिंदे , भिसी पो.स्टे.पोलीस निरीक्षक मनोज गभने , डॉ.कामडी , नगर परिषद अधिकारी रणखम्ब , डॉ.हटवादे , अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.