आनंदाची बातमी, आजपासुन 18 वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण

200

 

वणी : परशुराम पोटे

राज्यात कोरोना संसर्गाचे थैमान सुरू आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने १८ ते ४५ वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण १ मे पासून खुले केले आहे. परंतु लसीचा तुडवडा असल्याने वणीत लसीकरण होऊ शकले नव्हते परंतु आज दि.५ मे रोजी सायंकाळी येथिल ग्रामिण रुग्णालयात ५०० कोविशिल्ड आणी १००० कोवैक्सिन लसी उपलब्ध झाल्याने आज गुरुवारपासून (कोविन अँपवर) आनलाईन नोंदणी केलेल्या १८ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत लस मिळणार आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने मिळाली आहे.