रेमडेसिवीर इंजेक्शन न घेता ८६ वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मिळवला विजय !

82

 

हर्ष साखरे दखल न्युज

सध्या संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या सरकारच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहे. मात्र एका वयोवृद्ध शेतकऱ्याने स्वतःच्या आत्मविश्वासावर आणि डॉक्टरांच्या सल्यानुसार घेतलेल्या उपचारामुळे कोरोनाला हरवून सुखरूप घरी परतले आहे,. त्यात विशेष म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन न घेता त्यांनी कोरोनावर मात केली.

कोरोनावर मात करून परतल्यावर आजोबांचे कुटुंबियांनी फुलांच्या पाकळ्या उधळून स्वागत केले. कोरोना संसर्गामुळे प्रकृती गंभीर झाली होती. ऑक्सिजन पातळी ६५ पर्यंत खाली आली होती. भगवान कारळे यांना खोकल्याचा त्रास जाणवत होता. कुटुंबियांनी त्यांची कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते कोरोना बाधित आढळून आले. त्यावेळी त्यांचा एचआरसीटी स्कोर १४ होता. मंचरला कोठेही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही.

त्यात भगवान कारळे यांची ऑक्सिजन पातळी खालावली होती. सेवानिवृत्त सैनिक मुलगा दत्तात्रय कराळे, नातू प्रसाद कराळे व सून माजी सरपंच सुनीता कराळे यांनी बेडसाठी धावपळ केली. शरद सहकरी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी पुण्याच्या जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये भगवान कराळे यांना दाखल करण्यासाठी मंचरहून ऑक्सिजन सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

यावर परतिक्रिया देताना भगवान कारळे म्हणाले की, जिद्द व आत्मविश्वास कायम ठेवला. मी या आजारातून बाहेर येणार असा मला ठाम विश्वास होता. मनात इतर अविचारांनी गर्दी होऊ नये म्हणून गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे सतत नामस्मरण करत होतो. रुग्णांनी मनातील भीती दूर केली पाहिजे. आनंदी राहिल्यामुळे हा आजार पळून जाण्यास मदत होते.