जिल्हा परिषद विस्तार अधिकारी ( ग्रामपंचायत ) संघटनेचे अध्यक्षपदी देवाभाउ उराडे यांची अविरोध निवड

76

 

सावली ( सुधाकर दुधे )
चंद्रपुर जिल्ह्याच्या विस्तार अधिकारी ( गामपंचायत ) या संघटनेची सभा दि.९ एप्रिल २०२१ रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिदेवाही येथे आयोजीत करण्यात आली होती. सभेत जिल्हा कार्यकारीणीची, अध्यक्ष व सचिवाची निवड करण्यात आली असता अध्यक्षपदी एकमताने देवाभाऊ उराडे व सचिवपदी राजू राईंचवार याची निवड करण्यात आली . सभेला सिंदेवाही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणालकुमार उंदीरवाडे हे उपस्थित होते . दरम्यान सिदेवाही पंचायत समितीचे तत्कालीन विस्तार अधिकारी ( ग्रामपंचायत ) श्री . नाकतोडे हे नियत वयोमानानुसार पदावरून सेवानिवृत झाल्यामुळे त्यांचा सपत्नीक सत्काराचा कार्यकम ठेवण्यात आला होता . कार्यकमाचे सुत्रसंचालन राजू परसावार विस्तार अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.बैनलवार विस्तार अधिकारी यांनी केले .