आष्टी येथे 100 खाटांचे कोविड सेंटर तात्काळ उभारावे निवेदनाद्वारे केली जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांनी मागणी

251

 

उपसंपादक /अशोक खंडारे

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी 100 खाटांचे कोविड सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी गडचिरोली यांना केली आहे.
आष्टी व परीसरात कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत व दिवसेंदिवस बाधीतांचा आकडा वाढत जाते आहे . तसेच सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या ठिकाणाहून गडचिरोली ला रेफर केलेल्या रुग्णाना कधी वाहन वेळेवरच उपलब्ध होत नाही जर झालेच तर 150 ते 200 किलोमीटर चा अंतर कापता वाटेतच मृत्यू ला सामोरे जावे लागते अशी या परीसरातील गोरगरीब जनतेची कुचंबणा होत आहे अशा परीस्थितीत जवळपास कोविड सेंटर असले तर गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे .
त्या करीता आष्टी येथे 100 खाटांचे व 50 आक्सीजन खाटांचे सेंटर देण्यात यावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय पंदिलवार यांनी केली आहे.