बंगाल मधिल अत्याचाराचा वणीत निषेध, भाजपाचे काळे झेंडे दाखवून निदर्शन

111

 

वणी : परशुराम पोटे

पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या विरोधात वणी शहर व तालुका भाजपाचे वतिने आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात आज दि.५ मे रोजी सकाळी १०:३० वाजता आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून निदर्शन करण्यात आले.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आटोपल्यानंतर तेथिल ममता बॅनर्जी यांच्या तृनमुल कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ल्याचे सत्र सुरु केले आहे. या हिंसाचारात अनेक भाजपा कार्यकर्त्यांचा मृत्यु झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणुन भाजपाचे वतिने आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आले.
यावेळी भाजपाचे पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, जिल्हा महामंत्री रवी बेलुरकर, दिनकरराव पावडे, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे न.प.उपाध्यक्ष, नितीन वासेकर, संदिप बेसरकर, दिपक पाऊनकर , अवी आवारी, गुरुदेव चिडे, शुभम गोरे, वैभव मेहता,अक्षय देठे यांचेसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.