सावली कोविड सेंटरला व्यवस्था तोकडी बाधितावर उपचार करण्यास होत आहे अडचण

40

 

सावली ( सुधाकर दुधे )

सावली येथे कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये डॉ. धुर्वे, डॉ. बनसोड, डॉ. रामटेके सह 8 परिचारिका बाधितावर उपचार करीत असून गृह विलगीकरण असणाऱ्या रुग्णांना डॉ. नेत्तुलवार अविरत सेवा पुरवीत आहेत. सेंटरमधील रुग्णाचे दर चार तासांनी आक्सिजन लेवल, बीपी, शुगर तपासणी केल्या जात आहे. या सेंटरला 6 अक्सिडेंट बेडची व्यवस्था केली असली तरीही वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अधिकच्या अक्सिजन बेडची आवश्यकता आहे. या सेंटरला अक्सिजन उपलब्ध असून मात्र फ्लोमीटर सह ह्यूमीटर फायर नसल्याने कोरोना बाधितांवर उपचार करण्यास अडचण निर्माण होत असल्याची ओरड आहे. त्यामुळे ऑक्सिजन असून गंभीर रुग्णावर उपचार करणे शक्य होत नाही. या सेंटरला पाहिजे त्या प्रमाणात मनुष्यबळ नसल्याने बाधितांना आरोग्य सेवा पुरवण्यास व्यवस्था तोकडी होत आहे. रुग्णांना ने-आण करण्याकरिता रुग्णवाहिकेची गरज आहे. एका रुग्णवाहिका वर या सेंटरचा भार असून एका रुग्णामागे अंदाजे चार तासाचा वेळ जात असल्याने पुन्हा रुग्णवाहिकेची गरज असून 20 अक्सिजन बेड ची मागणी सावली तालुक्यातील जनतेने केली आहे.

– कोट
सावली कोविड सेंटर मध्ये रुग्णाची काळजी घेतल्या जात असून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. सावली सेंटरला 20 फ्लूमीटर सह ह्यूमीटर फायर ची आवश्यकता असून याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे करण्यात आलेली आहे.

नितीन दुवावार
अध्यक्ष युथ काँग्रेस सावली.