आकाश अग्रवाल व कैलास अग्रवाल यांच्या कडून ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीन ची पूर्तता

180

 

पंकज चहांदे
दखल न्यूज भारत

देसाईगंज :- देसाईगंज येथील प्रसिध्द उद्योगपती तथा युवा समाजसेवक आकाश अग्रवाल व कैलास अग्रवाल यांनी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीन ची पूर्तता करून पुन्हा एकदा महामारीत आपल्या समाजकार्याचा परिचय दिला. नुकतेच 10-12 दिवसापूर्वी जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडर ची कमतरता जाणून घेऊन दोन्ही अग्रवाल बंधूंनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला तब्बल 200 ऑक्सिजन सिलेंडर चा पुरवठा केलेला होता. ज्यामुळे शेकडो रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळण्यास मदत मिळाली. मात्र तरीसुद्धा सिलेंडर पुरवठा करण्याच्या व्यतिरिक्त हि अश्या संकटाच्या वेळी आपल्या कडून पुन्हा काय करता येईल याची शहानिशा करून त्यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे अतिआवश्यक असलेलेली ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीन ची कमी ओळखून ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीन ची पूर्तता करण्याच्या निर्णय घेतला याकरिता मा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांच्या कडे आपली कैफियत मांडली. त्यांच्या सेवाभाव कार्याला पाहून लगेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांनी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय देसाईगंज यांना पत्र पाठवून अग्रवाल बंधू यांच्या ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर मशीन प्राप्त करण्याच्या सूचना दिल्या. आकाश व कैलास अग्रवाल यांच्या या समाजसेवेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांच्या या सेवा भावी वृत्तीमुळे ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे गरजू रुग्णांना फायदा होईल यात दुमत नाही. साथरोगात त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत असल्याचे ही पहावयास मिळत आहे.