माझा खास मित्र हरहुन्नरी कलावंत हेमंत मेश्राम यांचे कोरोनाशी झुंज देत असताना निधन- गौतम गेडाम

271

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
चिंचपल्ली येथील नामवंत कलावंत ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होती ज्यांनी नागपूर येथील दीक्षाभूमी वर भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी टाकण्याचा विक्रम केला आणि त्याची नोंद लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवण्यात आली.
तसेच चिचपल्ली येथील सम्राट अशोक हायस्कूल मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची हेमंत यांनीच कलाकृती केलेली आहे.
तथागत भगवान बुद्धाच्या अप्रतिम अश्या बुद्ध मूर्त्या दरवर्षी नागपूर आणि चंद्रपूर च्या दीक्षाभूमी हेमंतच्या कलाकृतीचे खास आकर्षण होते.
स्टँडिंग बुद्ध (पाच फुटाची) आणि स्टँडिंग बाबासाहेब (पाच फुटाची) मूर्ती बनविण्याचे काम हेमंतने हातात घेतले होते.
चंद्रपूरच्या जिल्हा स्टडीयमवर छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य रांगोळी काढण्याचा सुध्दा हेमंत चा प्रयत्न सुरू होता.
मुंबईला जाऊन रेकॉर्ड ब्रेक रांगोळी काढून विश्व रेकार्ड निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतांना घात झाला.
कोरोना विषयी ची जनजागृती असो कि मोठे शिल्प कलाकृती असोत,नाट्य-गायक अश्या अनेक श्रेत्रात हेमंत मेश्राम यांनी आपला ठसा उमटवला होता.
अवघ्या ४८ व्या वर्षी हेमंतवर काळाने झेप घेतल्यामुळे समाजाचेच नव्हे तर जिल्हयाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा एका मोठ्या कलावंताला मुकला आहे.
जिल्हाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
त्याच्या कुटुंबाला प्राप्त परिस्थितीशी मुकाबला करण्याचे बळ लाभो.