पश्चिम बंगाल हिंसाचाराचा भाजप कडून निषेध

0
100

पिंपरी : पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर तेथे सुरू झालेल्या हिंसाचाराचा निषेध करीत दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी न करता निषेध नोंदविला. यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर नितीन काळजे, महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या कोषाध्यक्ष शैला मोळक, नगरसेवक अजित बुर्डे, भाजप महिला कार्यकारणी सदस्या कोमलताई काळभोर, ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष भाऊ रायकर उपस्थित होते.
पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्ता च्या घरी, कार्यालयांवर हल्ले करणे सुरू केले. या हिंसाचारात अनेक भाजपा कार्यकर्त्यांचा जीव गेला. प्रचंड नुकसान झाले.भाजपासह अन्य समविचारी संघटनाच्या कार्यकर्त्यांनाही मारहाण करण्यात आली. मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे वास्तविक रूप पुन्हा पुढे आले आहे असे महिला मोर्चाच्या कोषाध्यक्ष शैला मोळक यांनी सांगितले आहे.
सत्तेत येताच सुरू झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी आज भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करून हातात फलक घेत निषेध करण्यात आला. भाजपा कार्यकर्ता च्या हत्येला दोषी असलेल्यांना शिक्षा व्हावी व हिंसाचार थांबत नसेल तर पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी भाजप महिला कार्यकारणी सदस्या कोमलताई काळभोर यांनी केली.