विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी करवून घेतली करोना टेस्ट

97

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाने दिनांक १५ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात कडक लॉक डाऊन जारी केले. अत्यावश्यक कामा शिवाय नागरिकांच्या फिरण्यावर बंदी आणून संचारबंदी जारी केली.त्या सोबतच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी ७ ते ११ वा पर्यंत अत्यावश्यक सेवेची आस्थापने सुरू ठेवली.परंतु,ह्याचा गैरफायदा घेण्याच्या प्रवृत्तीत वाढ होऊन नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाने शहरात मुक्त संचार करीत असल्याचे निदर्शनास आल्या वर जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे स्वतः रोडवर उतरून एक्शन मोड वर दिसून आले. तसेच शहर वाहतूक शाखेने सुद्धा अश्या नागरिकांवर धडक कारवाई करून ९ हजाराचे वर दंडात्मक कारवाया करून लाखो रुपये दंड वसूल करून जवळपास ४०० च्या वर वाहने जप्त करून वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले.शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम हे शहरातील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह एक्शन मोड वर राहूनही शहरात रस्त्यावरील गर्दी कमी न झाल्यामुळे आज कोतवाली चौकात पोलिसांनी मनपा चे सहकार्याने व पावस अजयसिंग सेंगर ह्यांनी स्वतःचे मालकीची लक्सरी वाहन टेस्टिंग साठी उपलब्ध करून दिल्याने शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, कोतवाली पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक उत्तमराव जाधव, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोतवाली चौकात स्वतः थांबून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करवून घेतली.जवळपास १५० च्या वर नागरिकांची कोविड चाचणी मनपा चे वैद्यकीय चमू कडून करून घेण्यात आली.ह्या वेळी मनपा चे क्षेत्रीय अधिकारी टापरे हे आपल्या वैद्यकीय चमू सोबत उपस्थित होते.तसेच पावस ट्रॅव्हल्स चे पावस अजयसिंग सेंगर हे सुद्धा जातीने हजर होते.ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात येईल किंवा त्यांना गृह विलगीकरण करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर,अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत ह्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, गजानन शेळके ह्यांनी केली.