सावर्डे ,वहाळ आरोग्य केंद्रास सभापती रिया कांबळे यांनी दिली भेट आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा घेतला आढावा

61

 

प्रतिनिधी : (ओंकार रेळेकर)

चिपळूण : चिपळूण पंचायत समिती सभापती सौ, रीयाताई कांबळे यांनी आज सावडॆॅ ,वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना रुग्णाची माहीती घेतली येणाऱ्या रुग्णांना चांगले उपचार दया असे सांगून सावडॆॅ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ, पाटील यांच्या कडून काही समस्या जाणून घेतल्या या वेळी सामाजीक कार्यकर्ते राजुभाई जाधव, माजी संरपच शौकत माखजणकर, सुभाष सावंत, ग्रामपंचायत सदस्या सौ सावंत उपस्थित होत्या
वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ, सौ, पांडे यांच्या कडून सभापती सौ रीयाताई कांबळे यांनी रुग्णाची माहीती घेतली या वेळी माजी सभापती सुरेशजी खापले, सामाजिक कार्यकर्ते राजुभाई जाधव उपस्थित होते
चिपळूण तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्र अडरे, शिरगाव, दादर, कापरे, रामपूर, खरवते ,सावडेॅ, वहाळ या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सभापती सौ. रीयाताई कांबळे यांनी भेट दिली उद्या फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन पाहणी करणार आहेत.

*दखल न्यूज भारत.*