कुंभा येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने निर्जंतुकिकरण फवारणी जग, देश व राज्याला कोरोना व्हायरसने ग्रासले आहे. या काळात आलेला शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा वाढदिवस जाहिराती किंवा फेक्स लावून न करता एखादा सामाजिक उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन केले होते.

0
125

 

प्रतिनिधी: रोहन आदेवार

मारेगाव: तालुक्यात कोरोनाचा वाढता क्रम लक्षात घेता मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसा निमित्ताने ता.२९ जुलै ला कुंभा येथे शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या वतीने सोडियम हायड्रोक्लोराईड या जन्तु नाशकाची फवारणी करून कुंभा येथे शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या वतीने वेगळ्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा वाढदिवस २७ जुलै ला असतो पण यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला.त्या ऐवजी हितचिंतकानीं मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी द्यावी,नियम पाळून आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित करावी,प्लाझ्मा दान करावे, वस्त्यांचे निर्जंतुकिकरण करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर कुंभा येथे वणी विधानसभेचे माजी आमदार तथा जिल्हा शिवसेना अध्यक्ष विश्वास नांदेकर यांच्या
मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या आणी युवासेनेच्या वतीने सोडियम हायड्रोक्लोराईड या जन्तु नाशकाची फवारणी करण्यात आली. या वेळी तालुका प्रमुख शिवसेना व पं.स.उपसभापती संजय आवारी,युवासेनेचे तालुका प्रमुख मयुर ठाकरे ,विभागीय प्रमुख अंकुश जोगी, आदी युवावासेनेचे आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.गावकऱ्यांनी युवासेनेच्या आणि शिवसेनेच्या निर्जंतुकिकरण उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आहे.