काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांचा मदतीचा ओघ सुरुच गरजूंना दिली आर्थिक मदत

38

 

प्रतिनिधी : ओंकार रेेेळेकर.

चिपळूण : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रोजगारही थप्प असल्याने हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच माणुसकीचे दर्शनही घडत आहे. अनेक मदतीचे हात पुढे येताना दिसत आहेत. काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रशांत यादव यांचाही मदतीचा ओघ सुरुच आहे. कोरोना महामारीत अनेकांना त्यांनी विविध प्रकारची मदत दिली आहे. नुकतीच त्यांनी अनेक गरजू कुटूंबांना आर्थिक मदत दिली. श्री. यादव यांच्यावतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. राजुभाई जाधव, युवक काँग्रेसचे चिपळूण शहराध्यक्ष, युवा नेते फैसलभाई पिलपिले यांनी ही मदत सुपुर्द केली. सर्वांनी श्री. यादव यांचे आभार मानले.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून श्री. यादव यांचे मदत कार्य सुरुच आहे. त्यांच्या कार्याचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.

*दखल न्यूज भारत*