निषेध ! निषेध !! निषेध !!! राज्याचे क्याबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री यांचे क्षेत्रातील निकटवर्तीय कार्यकर्त्याकडून फोनद्वारे पत्रकाराला अश्लील शिवीगाळ व घरी येऊन मारण्याची धमकी

604

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत टि. पोपटे,
उपसंपादक-९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत

राज्याचे मदत पुनर्वसन विभागाचे क्याबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे निर्वाचन क्षेत्रातील व पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याचा आव आनणारा नवरगांव ता. सिंदेवाही येथील कॉंग्रेसचा कार्यकर्ता विनोद लोनकर याने दिनांक ०४/०५ २०२१ ला सकाळी १० वाजताचे सुमारास सिंदेवाही तालुका पुरोगामी पत्रकार संघाचे तालुका संपर्क प्रमुख अमोल निनावे यांना भ्रमणध्वणीवरून अश्लील शिवीगाळ करीत घरी जाऊन मारण्याची धमकी दिली. कारण काय तर अमोल निनावे या नवरगांव येथील पत्रकाराने प्रबोधिनी वेब पोर्टलवर नवरगांव ग्रामपंचायतने गांवात कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या कुटूंबीयांचे घरी व आजूबाजूला स्यानेटॉयझरची फवारणी केली नाही. अशी जनहितावह बातमी प्रकाशीत करूण, नवरगांव ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधन्याचा जनहितावह चांगला प्रकार केला. सदर बातमी अनेक वेब पोर्टलला व व्रुत्तपत्रांमध्ये प्रकाशीत झाली असल्याचे खात्रीलायक व्रुत्त प्रकाशीत झाले असतांना त्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासन वा पदाधिकारी यांनी कुणीही आक्षेप घेतला नाही. परंतू विनोद लोनकर ह्याचा ग्रामपंचायतचा नागरिक येवढाच संमंध असतांना व ग्रामपंचायत च्या कोणत्याही समितीवर नसतांना पालकमंत्र्याचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याचा आव आणून अमोल निनावे या पत्रकाराला भ्रमणध्वणीवरून अश्लील शिविगाळ करणे व घरी जाऊन मारण्याची धमकी देणे हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. सदर प्रकाराची ऑडिओ क्लिप व्हॉयरल झाल्याने निश्चितच पत्रकाराची मानहाणी व बदनामी सुद्धा झाली आहे.
सदर प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता, सिंदेवाही तालुका पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवंत पोपटे यांनी पत्रकारावर झालेल्या भ्याड क्रुत्त्याचा निषेध व्यक्त करत सिंदेवाही पोलीस स्टेशणला लेखी तक्रार दिली. व पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत विनोद लोनकर याचेवर कारवाई करूण अटक करण्याची मागणी केली. सध्या सर्वत्र कोरोना माहामारी सुरू असून जिल्ह्यातील व तालुक्यातील पत्रकार हा आपला व आपले कुटूंबाचा जिव धोक्यात घालून कोरोना माहामारीचे व्रुत्त संकलन करण्यासाठी जिवाची बाजी लावत समाजसेवेचे काम करीत असतो. परंतू पत्रकारांचे कौतुक करण्याऐवजी त्यांना नाहक अश्लील शिवीगाळ करून घरी जाऊन मारण्याची धमकी दिली जाते. अमोल निनावे याचे वय्यक्तीक तक्रारीवरून सिंदेवाही पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करत असता, ५०४ व ५०६ कलमांतर्गत नोंद घेतली गेली. राज्य शासनाने पारीत केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत पत्रकारांवर अशा घटणा घडल्यास ३ वर्ष शिक्षेची व ५०,०००/- रुपये दंडाची तरतूद असतांना सिंदेवाही पोलीसांनी कारवाई करण्यात असमर्थता दाखविने योग्य नाही. सदर प्रकरणाची योग्य चौकशी होऊन अश्लील शिवीगाळ व घरी जाऊन मारण्याची धमकी देणाऱ्या विनोद लोनकर याचेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसे झाले नाही तर, चंद्रपूर जिल्हा पुरोगामी पत्रकार संघ व राज्य पुरोगामी पत्रकार संघाचे वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीत दिलेला असेन, आंदोलनादरम्यान कांही अनुचीत प्रकार झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे कळविले आहे.
सिंदेवाही पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक गोपीचंर नेरकर यांना लेखी तक्रार देतांना पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष- रुपेशजी निमसरकार, तालुका अध्यक्ष- भगवंत पोपटे, उपाध्यक्ष- मिथुन मेश्राम, कार्याध्यक्ष- आक्रोश खोबरागडे, कोषाध्यक्ष- अमान कुरेशी, प्रसिद्धी प्रमूख- कुणाल उंदीरवाडे, अन्यायग्रस्त संपर्क प्रमूख अमोल निनावे व अंबादास दुधे आदी उपस्थित होते.