सिंदेवाहीतील अवैध रेती साठा कुणाचा ? सिंदेवाही चे तहसिलदार कारवाई करतील काय ?

357

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत टि. पोपटे,
उपसंपादक-९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत

जिल्ह्यात व सिंदेवाही तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून रेती घाटांचे लिलाव रखडल्याने रेती तस्करांची लॉबी सक्रीय झाली आहे. व रेती तस्करी करून, घरे बांकाम करणाऱ्यांना चढ्या भावाने रेती विकून तस्कर मालामाल झाले आहेत. परंतू याची झळ महसूलचे तिजोरीला तर बसलीच, सोबतच जिल्ह्यातील व सिंदेवाही तालुक्यातील शासनाचे घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांना एकदमच फटका बसला असेच म्हणावे लागेल.
तालुक्यामध्ये रेती तस्करी जोमात सुरू असून, महिन्यातून एक-दोन वाहनांवर सिंदेवाही महसूल विभागाकडून कारवाई केल्याचे दिसते. असाच प्रकार सिंदेवाहीतील इंदिरानगरला जाणाऱ्या रोडने, दुर्गा टेकडीकडे जानारा रोड व आठवडी बाजाराकडे जानारा रोड या त्रिकोणी भागात शेकडो ब्रासचा अवैध रेती साठा पडलेला असून, महसूल विभागाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. तहसिलदार सिंदेवाही यांना याची माहिती मिळाली असतांना सुद्धा अजूनपर्यंत त्या अवैध रेती साठ्यावर कारवाई कां झाली नाही ? हे एक न उमगणारे कोडेच आहे. सदरचा अवैध रेती स्टॉक हा गेल्या १५,१६ महिन्यापासून असतांना व तहसिलदारांना याची माहिती असतांनाही त्याबाबत साधी चौकशीही होऊ नये! त्यामुळे ती बाब गुंतागूंतीची होऊ शकते, यात शंकाच नाही.
सिंदेवाहीतील घरकून लाभार्थी नागरिकांमध्ये अशी कुजबूज सूरू आहे की, रेती अभावी घरकुलाचे काम थांबले असून, आम्हाला घरकुलाचे बांधकाम करता येत नाही. व रेतीघाटाचा लिलाव नसतांना सदर ठिकाणी येवढा रेती स्टॉक आला कुठून ? तेव्हा सिंदेवाहीचे तहसिलदार कारवाई करण्यास धजावतील काय? किंवा तेरीभी चुप। मेरीभी चुप। असा प्रकार होऊ नये. अशी सिंदेवाहीतील घरकुल लाभार्थ्यांची मागणी असून, ती रास्त पण आहे. बघूया तहसिलदार गणेश जगदाळे सिंदेवाही हे कोणती कारवाई करतात ते !