घुग्घुस नगरपरिषद च्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाख चे विमा संरक्षण द्यावे आम आदमी पार्टी ची मागणी

177

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

कोविद 19 च्या पार्श्वभूमीवर जिथं संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे तिथे आपल्या घुग्घुस नगरपरिषद चे कर्मचारी दिवस रात्र सेवा देत आहे न थकता न सुट्टी घेता आपल्या कामाला जबाबदारी समझुन कार्य करत आहे .अश्या पद्धतीने हे कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून निरंतर सेवा देत आहेत मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याचा कोविद ने मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी हा खूप मोठा प्रश्न आहे. हे सर्व कर्मचारी सामान्य घरातून असल्या मुळे यांच्या परिवार ची जीमेदारी कोण घेईल हा विचार करायला पाहिजे म्हणून आम आदमी पार्टी घुग्घुस शाखे तर्फे आज नगरपरिषद ला निवेदन देऊन मागणी केली आहे. या सर्व कर्मचाऱ्याना 50 लाख चे विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.