आमदार (सुभाष धोटेंची क्षेत्रातील उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक. प्रत्येक समुहाने ५० बेडचे कोरोना केयर सेंटर आणि २० आॅक्सिजन बेड, अ‍ॅम्ब्युलन्स ची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना.

31

 

राजुरा :- आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात राजुरा विधानसभा क्षेत्रातील स्थानिक उद्योग समूहाच्या प्रतिनिधींसोबत बैठक संपन्न झाली. यात आमदार सुभाष धोटे यांनी या उद्योग समूहाच्या प्रतिनिधींना आवाहन केले की सर्व कंपन्यांच्या माध्यमातून कोविड 19 च्या काळात ग्रामीण भागातील जनतेकरीता सी एस आर फंडातून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व कंपन्यांनी मिळून क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयासाठी एन आय व्ही वेंन्टीलेशन, आॅक्सिजन कन्सेन्ट्रेटर, जंम्बो सीलेंडर, आॅक्सिजन फ्लोमिटर, पल्स आॅक्सिमिटर, मल्टिपॅरा माॅनिटर आणि मेडिसीन्स इत्यादी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच वेकोली, अंबुजा, अल्ट्राटेक, मानिकगड आणि दालमिया या बड्या उद्योग समूहांना प्रत्येकी ५० बेडचे कोरोना केयर सेंटर आणि २० आॅक्सिजन बेड ची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या. तसेच प्रत्येक उद्योग समूहाने कोरोना रुग्णांची ने आन करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याची देखील सुचना केली आहे.
आमदार सुभाष धोटे यांच्या आवाहनाला क्षेत्रातील सर्व स्थानिक उद्योग समूहांनी सकारात्मक प्रतिसाद देत आमदारांच्या सुचनेनुसार स्थानिक परिसरात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता क्षेत्रातील राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, सीओ विशाखा शेरकी, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विनोद डोणगावकर, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, वेकोलीचे सी पी सिंग, समीर भरले, डॉ. ओवेश अली, अल्ट्राटेकचे सचिन गोवारदिपे, डॉ. पाल, माणिकगड सिमेंटचे राजेश झाडे, अंबुजा सिमेंटचे श्रीकांत कुंभारे, दालमियाचे उमेश कोल्हटकर, प्रमिल वंजारी यासह विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी, पत्रकार उपस्थित होते.