RSS अहेरी नगर तथा शिवजन्मोत्सव समिती अहेरी द्वारा आयोजित भव्य रक्तदान शिबिर 21 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

30

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अहेरी नगर तथा शिवजन्मोत्सव समिती अहेरी द्वारा आज अहेरी येथिल डॉ.हेडगेवार सेवा समिती कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात शिवजन्मोत्सव समितीच्या सदस्यासह 21 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप बघता ठीकठिकाणी रुग्णांना रक्त व प्लाझ्मा ची गरज भासत आहे.त्यामुळे सध्याच्या कठीण काळात युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्ताची निकड पूर्ण करून राष्ट्रसेवेत हातभार लावावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येत आहे.
यावेळी रक्तदान शिबिरात अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी विभागाच्या सरिता वाघ,निखिल कोंडपर्ती व शरद बांबोळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी रक्तदान शिबिराला जिल्हा सहसंघचालक गजानन राऊलवार यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल उंचावले.रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संतोष मद्दीवार,क्षितीज कविराजवार, नीरज गुरनुले,ओंकार कोडगिरवार ,तुषार पारेल्लीवार ,जीवन नवले,सूचित कोडेलवार,आदेश मंचालवार,रक्षित नरहरशेट्टीवार, रितिक कुंभारे,गणेश येलमुले,अभिषेक कविराजवार, आदींनी विशेष परिश्रम घेतले.