श्रीमती आर. पी. पालशेतकर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय पालशेत चा दहावीचा निकाल १०० टक्के प्रशांत पालशेतकर यांनी केले यशस्वी मुलांचे अभिनंदन

0
107

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण : कर्मवीर रयत शिक्षण संस्था .सातारा संलग्न असलेल्या गुहागर तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती आर. पी. पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत च्या विद्यार्थ्यानी उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत या शाळेचा दहावीचा निकाल १००% लागला आहे , आपल्या पाल्याच्या पुढील शैक्षणिक दृष्टीने वाटचाल बाबत कोरोना संकटकाळात दहावीच्या निकालाची सर्वच पालकांना उत्सुकता लागली होती,अखेर बुधवारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होताच अनेकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे,
श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत च्या मृण्मयी अरविंद पटेकर या विद्यार्थिनीने ९५.४० % गुण मिळवत संपूर्ण शाळेत दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला आहे,तर द्वितीय निधी अमित ठाकूर ९४.४० %, तृतीय शिवानी संदीप हळवे ९४ % , तृतीय .विघ्नेश विनोंद अडुरकर ९४ % या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवीत शाळेचे नाव उंचावत गुणवत्ता यादीत शाळेचे नाव कायम ठेवले आहे,दहावीच्या परीक्षेत एकूण १२२ विद्यार्थी संख्या होती यामध्ये ६९ विशेष प्राविण्य,४१ प्रथम श्रेणी,१२ द्वितीय श्रेणी मिळवत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे,
विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच यशाची परंपरा कायम : प्रशांत पालशेतकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे श्रेय त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध
परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि शिक्षक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन या मुळेच आमच्या स्कूल ची मुले घवघवीत यश संपादन करू शकली असल्याची प्रतिक्रिया रयत शिक्षण संस्था सातारा चे जनरल बॉडी सदस्य प्रशांत पालशेतकर
यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ही यशाची सुरुवात आहे, ती प्रत्येक टप्प्यांवर पुन्हा-पुन्हा सिद्ध करावी लागेल. या सर्व विद्यार्थी-पालकआणि हितचिंतकांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचेसमाधान आगळे आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शब्द अपुरेपडत आहे. या यशाबद्दल स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, पालकांचे मी अभिनंदन करतो, असे पालशेतकर यांनी सांगितले.तसेच त्यांनी मुलांसाठी शिक्षणात मेहनत घेणारे पालक,शिक्षक यांचे आभार मानले गेले.

दखल न्यूज भारत