आरमोरी तालुक्यात रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे निवेदनातून मागणी

0
227

देवानंद जांभुळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आरमोरी- गडचिरोली जिल्हासह आरमोरी तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागात कोविड प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु असुन बरेच रुग्ण गावोगावी पाॅझिटिव्ह निघत असल्यामुळे आझिजन कमि झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यासाठी वेळेवर रुग्णसेवा मिळत नसल्याने गरीब रुग्णाना शारीरिक मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने आरमोरी तालुक्यात मदत व पुनर्वसन निधीतून आरमोरी उपजिल्हा रुग्णालय, जोगीसाखरा ग्रामपंचायत, व प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे निवेदनातून केली आहे.

आरमोरी तालुका हे लोकसंखेत सवात मोठा तालुका असुन सभोवताली अनेक ग्रामीण गावे आहेत परंतु त्या ठिकाणी पाहीजेत तसे आरोग्याच्या सुविधा नाही त्यामुळे रुग्णांना ग्रामिण भागातुन रुग्णांना खाजगी बिना आसिझन लावलेल्या वाहणानी आपले जिव धोक्यात ठेऊन आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणावे लागतो गेल्या वर्षापासून कोवीड -19 चा प्रादुर्भाव सर्वत्र सुरू आहे यंदाही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात सुरू असून बरेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघताहेत आहेत कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एवढ्या मोठ्या आरमोरी तालुक्यातील सभोवतालच्या गावातून बरेच रुग्ण पाझिटिव्ह निघत आहेत अशा परिस्थितीत रुग्णांना गडचिरोली किंवा इतर कोविड सेंटरवर हलवावे लागते त्यासाठी वेळेवर गोरगरीब रुग्णांना रुग्णवाहीका मिळणे आवश्यक आहे परंतु आरमोरी तालुक्यात बोटावर मोजण्या ईतक्याच रुग्णवाहीका त्याही जास्तीत जास्त डिलिवरी पेशंट साठीच उपलब्ध असल्याने वेळेवर कोरोना पाझिटिव्ह रुग्णांसाठी मिळत नसल्याने दुर्गम ग्रामिण भागातील रुग्ण बहुतेक रुग्णवाहिके अभावि वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाले आहेत त्यामुळे आरमोरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आरमोरी ग्रामपंचायत जोगी साखरा प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी येथे मदत व पुनर्वसन निधीतून रुग्णवाहीका उपलब्ध करून द्या अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे निवेदनातून मागणी केली आहे.
या मागणीची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दखल घेऊन लवकरच आरमोरी तालुक्याला रुग्णवाहीका उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याना दिले
असल्याने रग्णाना आपत्कालीन काळांत रुग्णवाहीका मिळण्यास दिलासा मिळणार आहे.