आडगाव खु. ग्रामपंचायत च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न ४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

69

 

अकोट प्रतिनिधी

दि. ४ मे रोजी अडगाव खु. येथे गटग्रामपंचायत च्या वतिने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन अडगाव खु. ग्रामपंचायत चे आदर्श सरपंच प्रमोद सोनोने यांनी स्वता रक्तदान करुन रक्तदानाला सुरुवात केली.कोरोना काळात रक्ताचा पुरवठा कमी असल्यामुळे अडगाव खु. येथील ग्रामपंचायत च्या वतीने मदत मनुन शिबिराचे आयोजन केले, ग्रामपंचायत चे ग्रामसेवक डाबेराव साहेब ,ग्रामपंचायत सदस्य अमन गवई ,वसिम शहा ,प्रफुल लायडे ,महेन्द्रा गवई ,प्रमुख उपस्थित होते. तसेच सरपंच प्रमोद सोनोने यांनी आपल्या समाजसेवेतुन ४५ वर्ष या वयात आतापर्यंत ३१ वेळा रक्तदान करुन एक उत्तम उदारन गावासमोर दिले ,तसेच मा. सैनिक अकोला पोलिस शंकर गवई यांनी या शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढविले ,रक्तदान शिबिराला गावातिल तब्बल ४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी विक्की सोनोने सिद्धार्थ दामले, निलेश तिवारी, निलेश सोनोने यांच्या सह आदी उपस्थित होते.