क्षेत्रिय टिम द्वारा आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या बेकायदेशीर बांधकामाची होणार तात्काळ चौकशी! — उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे सुतोवाच! — प्लाॅन्ट द्वारा काम करण्याची कार्यपद्धत सुध्दा हाणीकारक.. — चिमूर तालुक्याचे दुर्भाग्य?

207

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

चिमूर तालुक्यातंर्गत मौजा मालेवाडा येथील आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टचे बांधकाम हे नियमानुसार आहे की बेकायदेशीर आहे,या संबंधाने चिमूर उपविभागीय कार्यालयातंर्गत कार्यरत असलेल्या महसूल विभागाच्या क्षेत्रीय टिम द्वारा चौकशी करणार असल्याचे सुतोवाच उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी दखल न्यूज सोबत भ्रमणध्वनी द्वारे बोलताना सोडले आहे.

आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टचे बांधकाम हे चिमूर विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार यांचे शेतात असून त्यांचा नातेवाईक हा सदर प्लाॅन्टचे कामकाज पहातो आहे.स्थानिक आमदारांच्या शेतात आणि तेही मालदार आमदारांच्या शेतात आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टचे बांधकाम असल्याने सबंधीत सर्व अधिकारी मुंग गिळून गप्प बसले आहेत.परंतू आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या बांधकामांबाबतीत व कार्यपद्धती बाबतीत कायदेशीर कार्यप्रणाली नुसार कामकाज करण्याची कार्यपध्दत सबंधीत अधिकाऱ्यांची नसावी,यासारखे दुर्भाग्य चिमूर तालुक्याचे दुसरे असूच शकत नाही.

आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या बांधकामा बाबत माहिती विचारणारे वार्तांकन व्यक्ती बेअक्कल असल्याचे समजून सबंधीत अधिकाऱ्यांचा बनवाबनवीचा थाट लय भारी व जोकपुर्ण दिसतो आहे.अधिकाऱ्यांनी कोणत्या व्यक्ती सोबत बनवाबनवीचा प्रकार करायला पाहिजे याचे भान त्यांना राहात नसेल तर त्यांच्या सारखे अती शहाने दुसरे कोणीही राहू शकत नाही.वृत्तपत्रात काम करणारे व्यक्ती कायदेशीर मार्गाने सखोल जातात,याचे विस्मरण प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना होत असेल तर असे अधिकारी स्वतःची स्वत:च फसगत करीत असल्याचे दिसून येते.
आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या बांधकामा बाबत ज्या-ज्या कार्यालयातंर्गत नाहरकत प्रमाणपत्र सादर केले आहेत व सदर प्लाॅन्टच्या बांधकामांचा रस्ता खुला केला आहे,त्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्वत:च्या कार्यालयातील नाहरकत प्रमाणपत्रांची माहिती नसावी,असे कधी होत काय?पण या आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या बांधकामा बाबतीत होत आहे.एवढा धाक आणि दरारा आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या संचालकांचा,सबंधीत अधिकाऱ्यांना असल्याचे त्यांच्या गप्प बसण्याच्या प्रकारावरुन लक्षात येते.

आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या बांधकामा बरोबरच या प्लाॅन्टच्या नियमबाह्य कामकाज कार्यपद्धतीची क्षेत्रीय चंमू द्वारे नियमानुसार तात्काळ सखोल व निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.स्थानिक आमदारांच्या शेतातील प्लाॅन्ट बांधकाम आहे म्हणून थातूरमातूर चौकशी होणार नाही या संबंधाने चौकशी पथकाकडे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी जातीने लक्ष देणे महत्त्वाचे ठरते आहे.

नागरिकांनी तक्रार करावी व नंतर अधिकाऱ्यांनी प्लाॅन्टच्या नियमबाह्य बांधकामाची आणि नियमबाह्य कामकाजाची चौकशी करावी,हा तर एड्या मानसा सारखा मतीमंद कर्तव्याचा मतलबी भाग संबंधीतांचा दिसतो आहे.जनतेला बनवून किती बनवायचे,या बाबत सुध्दा एक सिमा असते.तक्रारीशिवाय नियमबाह्य बांधकामाची व इतर बाबींची चौकशी अधिकारी करु शकत नाही,हे त्यांनी सार्वजनिक करुन टाकले तर बरे होईल,असे आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या नियमबाह्य कार्यभागावरुन चित्र समोर येते आहे.
आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्ट सबंधातील चौकशी ही बांधकाम व पर्यावरणाच्या नियमावली नुसार सर्व मुद्यांवर जनहितार्थ होणे चिमूर तालुक्यातील नागरिकांना अपेक्षित आहे.चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ हे समजदार व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जनतेच्या नजरेत आहेतच!
***
*बाॅक्समधे..*
१)
[मौजा मालेवाडा येथील आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या बांधकामा बाबत व पर्यावरण अटी अंतर्गत,क्षेत्रीय चंमू द्वारे नियमानुसार सर्व प्रकारच्या बिंदू नुसार चौकशी तात्काळ करणार आहे..
प्रकाश संकपाळ
उपविभागीय अधिकारी चिमूर..]

२)

[ उपविभागीय सार्वजनिक बांधकाम चिमूर कार्यालयातंर्गत आय.सी.सी.हाॅटमिक्स प्लाॅन्टच्या बांधकामां बाबत नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले नाही व या कार्यालया द्वारा सदर प्लाॅन्टच्या बांधकामां बाबत नाहरकत प्रमाणपत्र देण्याची गरज नाही.स्वतःच्या शेतात प्लाॅन्टचे बांधकाम कोणीही करू शकतो…

राजेश सोनवाल
साहाय्यक अभियंता
उपविभागीय सार्वजनिक बांधकाम कार्यालय चिमूर..]

३)
[ हाॅटमिक्स प्लाॅन्टचे बांधकाम नियमबाह्य पद्धतीने करता येत नाही.स्वत:चे शेत असेल तरी मजबूत व कच्चे बांधकामा बाबतच्या सर्व प्रक्रिया नियमानुसारच पार पाडावे लागतात व प्लाॅन्टच्या माध्यमातून होणारे कामकाज सुध्दा पर्यावरण नियमानुसार होणे आवश्यक आहे…

एक अधिकारी..]