Home कोरोना  महादुला कोराडी येथील कोरोना पेशंटची वाढती संख्या बघता स्वामी विवेकानंद हॉस्पिटल व...

महादुला कोराडी येथील कोरोना पेशंटची वाढती संख्या बघता स्वामी विवेकानंद हॉस्पिटल व कोराडी जगदंबा देवस्थान येथील भक्त निवास कोरोंटाईन सेंटरकरिता शासनाने ताब्यात घ्यावे

882

 

दखल न्युज भारत टीम

महादुला-कोराडी / नागपुर: ३१ जुलै २०२०
नागपुर जिल्ह्यातील महादुला कोराडी हे सध्या कोरोना चे हाँट स्पाँट बनले आहे. इथे दिवसेंदिवस कोरोना पाँजिटीव पेशंट ची संख्या वाढत आहे. नागपुर शहरात पाँजिटीव पेशंट ची वाढती संख्या ३५०५ असुन १२६ नविन पाँजिटीव रुग्ण आढळून आले आहेत. संपुर्ण जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने नागरिकांना आमदार निवास, VNIT, व अन्य ठिकाणी कोरोंटाईन करण्यात आले आहे.संपुर्ण नागपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काँलेजेस तसेच सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेत हजारोंच्या संख्येने लोकांना कोरोंटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे आता सध्या तरी सर्व कोरोंटाईन, आयसोलेशन सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत. अशा परिस्थितीत महादुला-कोराडी येथील पाँजिटीव पेशंट आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना व नातेवाईकांना कुठे ठेवायचे असा प्रश्न भेडसावत आहे. काल जवळपास १३ पेशंट दिवसभरात सापडले. गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ राऊत हे स्वतः IGMC मध्ये जाऊन या पेशंट करिता Vacancies बघत आहेत. काल सापडलेले पाँजिटीव अजुनही घरातच कोरोंटाईन आहेत. त्यामुळे आता त्यांना कुठे कोरोंटाईन करावे ही समस्या उद्भवली आहे. वारेगाव येथील बौद्ध निवासी शाळेत पाँजिटीव पेशंट्सना होम कोरोंटाईन करण्यात येत आहे. परंतु तिथे सुद्धा जागा अपुरी पडेल. ज्या भक्त निवास निर्मितीसाठी शासनाने शेकडो कोटी रुपये खर्चीले त्या भक्त निवासावर कोराडी जगदंबा देवस्थान किंवा कोराडी ग्रा. पं चा हक्क कसा? शासनाने अविलंब येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल व कोराडी जगदंबा देवस्थान येथील भक्त निवास आपल्या ताब्यात घेऊन महादुला-कोराडी येथील पाँजिटीव नागरिकांना आयसोलेशन सेंटर उभे करण्यासाठी ताब्यात घ्यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
तेव्हा महादुला-कोराडी येथील नागरिकांच्या उपचारासाठी बनवलेले महाजेनको निर्मित स्वामी विवेकानंद हॉस्पिटल कोराडी येथे ४० बेडची तर जगदंबा देवस्थान कोराडी येथील २०० रुम चे भव्य भक्तनिवास आता तरी येथील राजकीय पुढाऱ्यांनी खुले करावे. सरतेशेवटी माणुस जगला तरच तो भक्ती करेल हे त्यांनी लक्षात घ्यावे. आपल्या भागात आढळणारे पेशंट हे आपले नागरिक आहेत आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आता आपल्या भागातील पुढाऱ्यांनी पुढे आलेच पाहिजे. शेकडो करोड रुपये शासनाकडून निधी घेऊन बनवलेल्या या भक्तनिवासावर पहिला हक्क आपल्या नागरिकांचाच आहे. त्यामुळे या कोरोना पेशंट्सना आपल्या भागात बनलेल्या स्वामी विवेकानंद हॉस्पिटल व कोराडी जगदंबा देवस्थान येथील भक्त निवास कोरोंटाईन करण्यासाठी अतितात्काळ द्यावे अन्यथा शासनाने यांवर ताबा घ्यावा. भक्ती आणि आस्थेचा आडंबर उभा करुन जनतेला भ्रमित करणे आणि आस्थेच्या नावाखाली फक्त पैसा कमाऊन व्यापार करणे हा उद्देश सध्या कोरोना संकटात करणे हे येथील पुढाऱ्यांनी सोडुन जनसेवा करावी. अन्यथा आपल्या च भागातील कोरोना पाँजिटीव पेशंट यांची गैरसोय व कोरोंटाईन, तसेच उपचाराअभावी म्रृत्युस तेच जबाबदार राहतील यात काही शंका नाही.

Previous articleबळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत… जिल्हाभरात १८ टक्के पावसाची पडली तूट… पावसाची, तुट वाढल्यास धान पीक धोक्यात येण्याची शक्यता…
Next articleश्रीमती आर. पी. पालशेतकर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय पालशेत चा दहावीचा निकाल १०० टक्के प्रशांत पालशेतकर यांनी केले यशस्वी मुलांचे अभिनंदन