जिवती येथे 100 बेडेड कोविड केअर सेंटर व 30 ऑक्‍सीजन बेडस् उपलब्‍ध करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

0
19

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

जिवती हा आदिवासी बहुल ग्रामीण भाग आहे. जिवती नगर पंचायत क्षेत्र व तालुक्‍याच्‍या ग्रामीण भागात कोरोना रूग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागातील रूग्‍णांना तातडीने वैदयकीय सेवा उपलब्ध व्‍हाव्‍या याद़ष्‍टीने 100 बेडेड कोविड केअर सेंटर जिवती येथे तयार करण्‍यात यावे त्‍याचप्रमाणे 30 ऑक्‍सीजन बेडस् सुध्‍दा उपलब्‍ध करण्‍यात यावे अशा सुचना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्‍या.

दिनांक ३ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरील मागणीच्‍या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेत चर्चा केली. या बैठकीला जिल्‍हा परिषदच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, पंचायत समिती उपसभापती महेश देवगते यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. कोविड केअर सेंटर मध्‍ये उत्‍तम प्रतिचे जेवण पुरविण्‍याबाबत नगर प‍ंचायतीने जिल्‍हाधिकारी यांचेकडे सादर केला आहे. सदर प्रस्‍तावाला मान्‍यता मिळण्‍याबाबत आपण जिल्‍हाधिकारी यांचेशी चर्चा करणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. या परिसरातील उदयोगांच्‍या सि.एस.आर. निधीच्‍या माध्‍यमातुन रूग्‍णवाहीका रूग्‍णांसाठी उपलब्‍ध करण्‍यात याव्‍यात अथवा किरायाची वाहने उपलब्‍ध करण्‍यात यावी अशा सुचना उपविभागीय अधिकारी यांना दिल्‍या. पद भरती बाबत त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिका-यांना दिले. त्‍याचप्रमाणे सेवानिव़त्‍त कर्मचा-यांना कंत्राटी पध्‍दतीने कामावर घेण्‍यात यावे व सफाई कामगारांना दुप्‍पट पगार देवून कामावर घेण्‍याबाबत नगर परिषदेच्‍या मुख्‍याधिका-यांना त्‍यांनी सुचित केले. प्रामुख्‍याने 100 बेडेड कोविड केअर सेंटर व 30 ऑक्‍सीजन बेडस् च्‍या प्रस्‍तावाला तातडीने मान्‍यता देण्‍याबाबत जिल्‍हाधिका-यांशी आपण चर्चा करणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले.