आरोग्य विषयक आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांची वणीत आढावा बैठक सभापती संजय पिंपळशेंडे यांनी गाव समित्यांना केले अलर्ट

55

 

वणी : विशाल ठोबंरे

वणी विधानसभा क्षेत्रासह तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरुच असुन दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. यातच आता सर्दी, ताप, खोकला,टाइफाइड या साथरोगाची भर पडल्याने नागरीकांच्या चिंतेत सुद्धा वाढ झाली आहे.
हि समस्या लक्षात घेता आरोग्य विषयक समस्या जाणुन घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी रविवारी दि.२ मे रोजी ग्रामिण रुग्णालयात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामिण रुग्णालय अधिक्षक, यांच्यासह उपस्थित डॉक्टरांकडुन तेथील रुग्णालयातील समस्या जाणुन घेतल्या व विविध सुचना केल्या,
यावेळी रुग्णांच्या सेवेकरीता चार एम्बुलेंस ची व्यवस्था तसेच दोन एमबीबीएस नविन डॉक्टरांची नियुक्ति सह काही वार्ड बॉय ची सुद्धा नियुक्ति करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच औषधांचा साठा,आक्सीजनची व्यवस्था कमी पडणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सूचना उपस्थित रुग्णालय प्रशासनाला केल्या, यावेळी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक धर्मेन्द्र सुलभेवार, डॉ. पोहे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास कांबळे, डॉ. इंगोले,डॉ. चव्हाण, यांचेसह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

ग्रामिण भागातील आरोग्य प्रशासनाने आरोग्य विषयक समस्यांकडे लक्ष द्यावे – सभापती संजय पिंपळशेंडे

सद्या ग्रामिण भागात कोरोनासह शर्दी, ताप, खोकला या साथरोगाची लागन सुरु झाली आहे. याकरिता नागरिकांनी घाबरुन न जाता उपचार करुन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले असून तालुका आरोग्य प्रशासनाने ग्रामिण भागाकडे लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच गाव समित्यांनी या आपातकालीन परिस्थितीत सतर्क राहुन आप आपला गावातील समस्या जाणुन घेवुन तात्काळ माहीती कळविण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांनी केले आहे.