रौंदळा येथे रक्तदान शिबीर संपन्न

102

 

अकोट प्रतिनिधी

दि.३० एप्रिल रोजी शुक्रवार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधुन नवयुवक मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत भवन येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी सर्व प्रथम राष्ट्र संत तुकडोजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांच्या प्रतिमाचे पुजन संतोष दिवनाले, किशोर सरोदे ,दिनेश चितोडे ,रंविद्र देशमुख , अविनाश सरोदे, रविंद्र गाडेकर, सतिश डिक्कर,पोलीस पाटील किशोर देशमुख या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर जि. एम. सी. सर्वोपचार रुग्णालय अकोला जिल्ह्यातील डॉ.आबिद अली व त्यांच्यी टीम यांनी रक्तदान शिबिराला आशिष वानखडे, गोपाल देशमुख, दिपक सिरसाट ,शुंभम गाडेकर, रवी ढगे ,निलेश कुकडे, रामा काळे, गणेश होळकर यांच्या पासून सुरवात करण्यात आली. या जागतिक कोरोना महामारीत रक्ताची अडचण लक्षात घेत जवळपास (३०) नवयुवकांनी “रक्तदान हे श्रेष्ठ दान” समजुन रक्तदान करन्यात आले. या शिबिरामध्ये विक्रम डिक्कर ,रतन अबगड, आकाश सरोदे कपिल राउत, सतिश डिक्कर, स्वप्नील मोकळकार विनय सरोदे, गोपाल गाडेकर जयवंत डिक्कर, गणेश खोटरे, निलेश निर्मळ, प्रतिक रोकडे, गोपाल आमले, गणेश तायडे, अक्षय दारोकार, रोहित गाडेकर, ऋषीकेश मार्के, उमेश बोदळे, संकेत डिक्कर, प्रविण ढेंगे, गोपाल आमले, श्याम डिक्कर, या नवयुवकांनी रक्तदान केले तसेच ज्यांनी रक्तदान केले त्यांना आयोजक किशोर सरोदे यांच्या कडून अल्पोपहार व चहा देण्यात आला. या शिबिरामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरीक विश्वास डिक्कर, सुनिल कोरडे , अंकुश ढगे, गजानन कोरडे व इतर काही नागरीक उपस्थित होते तसेच रक्तदान करणाराचे आयोजक किशोर सरोदे यांच्या वतीने अभिनंदन होत आहे.