आरमोरी येथील सर्पमित्र सापांसाठी व साप चावणाऱ्या लोकांसाठी ठरत आहेत मदतगार…

0
226

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

साप म्हणल्या बरोबर अंगावर शहारे येतात. भीतीचा वातावरण पसरतो आणि अश्या भीती पासून वाचवण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था करीत आहे व प्राणी व पक्षांचे जतन करण्यासाठी सदैव कार्यरत आहे. त्याचप्रमाणे अनेक साप पकडुन सापांना जीवनदान दिले जाते. सर्पदंश झालेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न देखील ते करीत असतात. कोरोणा सारख्या संकटाच्या घडीला सुद्धा वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थाचे सदस्य आपले काम जबाबदारीने पूर्ण करत आहेत. त्यांच्या कामाची चोहिकडून प्रशंसा होत आहे. मागील महिन्यापासून पावसाचे आगमन झाल्याने गावात साप येत आहेत आणि त्यांना पकडुन जंगलात सोडण्याचे काम ही संस्था करीत आहे. मागील महिन्यात एकूण 12 साप व 3 पक्षी पकडुन त्यांना जंगलात सोडण्यात आले. ना मरेल माणूस | ना मरेल साप. या संकल्पनेने ही संस्था काम करीत आहे.

साप दिसल्यास संपर्क करा.
देवानंद दुमाणे:-9321735053
दीपक सोंनकुसरे:-9579845489
करन गिरडकर:-7719988537