ACC कामगारांच्या हक्काच्या मागण्यासाठी करणार बेमुदत धरना आंदोलन जिल्हा महासचिव BRSP यांनी दिला इशारा

0
177

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

दिनांक 3 मे 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून ACC कंपनी चांदा सिमेंट नकोडा ला निवेदन देण्यात आले. या निवेदनाव्दारे ACC कंपनीला इशारा देण्यात आला कि दि. आठ मार्च 2021 रोजी ACC कंपनीतील मॅनेजमेंट नी बैठक घेऊन त्या बैठकीत एप्रिल महिन्यांपर्यंत आम्ही चोरी झाल्याला PF भरणा करू आणि प्रतीमाह 26 डय़ुटी, मेडिकल सुविधा, डब्बल ओवर टाईम, CL, PL, PH, हे पंधरा दिवसात करु असे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु या तोंडी आश्वासनाला दोन महिने ओल्याडुन गेले असुन सुद्धा चोरी झालेला PF चा भरणा केला * *गेला नाही. आता आम्हाला असे गृहीत धरावे लागत आहे की कंपनी मॅनेजमेंट व ठेकेदार या दोघांन मध्ये काही साठ गाठ आहे असे दिसुन येते. म्हणून हे गोर गरिब कामगारांचा चोरी केलेला PF हे दहा वर्षापासून हे ACC कंपनी भरत नाही आहे. ACC कंपनी हे ठेकेदारी कामगारांवर अत्याचार व शोषण करत आहे. असे सरळ सरळ दिसुन येते. आता आम्ही गप्प बसणार नाही असे सांगत जिल्हा महासचिव सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी म्हटले कि आता तीव्र भूमिका घेऊन जर ACC कंपनीने येत्या पंधरा दिवसांत जर या गोर गरिब ठेकेदारी कामगारांच्या चोरी केलेला PF भरला नाही व सर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर संपूर्ण ठेकेदारी कामगारांना घेऊन ACC कंपनीचा विरोधात जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत बेमुदत धरना आंदोलन करणार
असे निवेदन सादर करताना BRSP जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव, ईश्वर बेले,दिपक दिप, अशोक आसमपल्लीवार, अशोक भगत, दत्ता वाघमारे, सचिन माहुरे, इरफान पठाण, करण काळबांडे, जगदीश मारबते राकेश पारशिवे आदित्य सिंह सुमीत फुलकर, विलास पचारे, अरविंद चहांदे, नितीन कन्नाके, एकनाथ पावनकर,शरद पाईकराव, आदी उपस्थित होते