वणीत पुन्हा लसीकरण ठप्प, नागरीकांची पायपीट नागरीकांनी लसीकरणाबाबत माहिती घेऊनच ग्रा. रुग्णालय यावे, विनाकारण गर्दी करु नये

0
37

 

वणी : परशुराम पोटे

एकीकडे १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण खुले करण्यात आले आहे. तर दुसरीकडे ४५ वयोगटावरील नागरीकांना लसीकरणासाठी पायपीट करावी लागत आहे.
वणी येथिल ग्रामिण रुग्णालयात मागील तीन दिवसापासुन लस उपलब्ध नसल्याने लोकांना आल्या पावली वापस जावे लागत आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या ठिकाणावरुन येणाऱ्या नागरीकांना लस मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
माहीती नुसार 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण खुले केल्याने लसींचा तुटवडा भासत आहे. परिणामी तिन दिवसापासुन वणीत लस उपलब्ध नसुन अजुन दोन दिवस तरी नागरीकांना लसीकरणासाठी वाट पाहावी लागणार आहे. नागरीकांनी लस उपलब्धतेबाबत माहिती घेऊनच रुग्णालयात यावे विणाकारण गर्दी करु नये असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.