महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद संघाच्या सदस्य पदी सरपंच नंदा कुलसंगे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव महिला सरपंच

395

 

उपसंपादक /अशोक खंडारे

महाराष्ट्र राज्य ग्राम संवाद संघाच्या सदस्य पदी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ठाकरी येथील सरपंच नंदा कुलसंगे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आजिनाथ धामणे पाटील, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे यांनी आँनलाईन सभा घेऊन केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव महिला सरपंच या कार्यकारिणीत आहेत.
शासकीय योजना व गाव विकास या प्रथम येणाऱ्या अडचणी वर मात करण्यासाठी ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना महाराष्ट्र दिनी करन्यात आली आहे. महाराष्ट्र घडविण्यासाठी सरपंच हा महत्त्वाचा घटक आहे ग्रामविकास साधल्या जावा व सरपंच एकत्र यावेत हा एकमेव उद्देश आहे..
सरपंच नंदा कुलसंगे ठाकरी यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार, ग्रामसेवक इंद्रावन बारसागडे, ठाकरी चे उपसरपंच मधुकर दुम्मनवार, सदस्य सिताराम कुळसंगे, निलकंठ कुकुडकर,वनीता नागुलवार,इंदू येल्लम, गणपती येल्लम,विना बाकमवार यांनी अभिनंदन केले आहे.